मौजे म्हस्केवाडी ता. पारनेर ,जि.अहमदनगर हे अत्यंत मर्यादित लोकसंख्येचे छोटेसे गाव. येथील माणसांनी माणुसकी, प्रगती ज्ञानजोपासना यांची कास मात्र सदैव जपली . येथील तरुणवर्गाचे सदैव नाविन्य, समाजातील बदल , अधुनिकता यांची जपणूक केली. गावाला साहित्य, अध्ययन, वाङमय या क्षेत्राशी सबंधित एक अधिष्ठान असावे असे येथील तरुणांईला नेहमी वाटे या भावनेतूनच सर्व युवक वर्गाने एकत्र येऊन तत्कालीन जेष्ठच्या मार्गदर्शनातून सन १९९३ साली श्री गणेश सार्वजनिक वाचालायाची स्थापना झाली. वाचालाय स्थापन झाले. अनेकांच्या योगदानाने ,देणगीतून पुस्तके वाढू लागली. वाचनालयास महाराष्ट्राशासनाची मान्यता प्राप्त झाली त्यातून पुढे ‘ड’ ,’क’ व नंतर ‘ब’ दर्जा प्राप्त झाला. यामागे अनेक वाचनालय कार्यकर्ते व कार्यकारणी सदस्यांचे योगदान व सहकार्य लाभले.प्रगती होत राहिली.
आज वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असून वाचनालयातील एकूण पुस्तकांची संख्या ११,००० इतकी आहे. वाचनालयाच्या प्रगतीसाठी विद्यमान कार्यकारी मंडळ सदैव कार्यरत असून या भूमिकेतूनच स्वामी विवेकानंद स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन अभ्यासिका, बालकांच्या प्रोत्साहनासाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंधस्पर्धा, विविधगुणदर्शन स्पर्धांचे आयोजन जाते.’वाचनालय’ या संकल्पनेद्वारे घडणारे अपेक्षित कार्य हे सद्य परिस्थितीत चालू असणारया कार्यापेक्षा अधिक व्यापक असावे अशी धारणा मनात येते.वाचनालयाद्वारे समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक घटकाची साहित्यिक,बौदधिक,अध्ययनात्मक भूक भागविली जावी. या भावनात्मक दृष्टीकोनातून कोणते बदल अपेक्षित आहेत हा विचार मनात येतो.